#

Advertisement

Wednesday, July 15, 2026, July 15, 2026 WIB
Last Updated 2026-07-15T17:29:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सिया गोयलच्या वडिलांना तुकाराम मुंढेंचा दणका

Advertisement

पुण्यातील दुकानाला ठोकलं टाळं

पुणे : पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या कुटुंबीयांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांचे दुकान एफडीएने सील केलं आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या दुकानाला एफडीएने टाळं ठोकलं आहे. सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात BG Goyal and Company नावाने दुकान आहे. सुका मेवा आणि मसाल्यांची घाऊक विक्री येथे केली जाते. याच दुकानावर एफडीएने कारवाई केली असून दुकान सील केलं आहे. व्यवसायाचा परवाना नसून दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचं एफडीएने सांगितलं आहे. एफडीएने येथून आठ लाख रुपयांचा 4 हजार किलो माल जप्त केला आहे. 

पुण्यात अभिनंदनाचे बॅनर
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने 5 जिल्ह्यांत पसरलेलं दूध भेसळीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं, ज्याची पाळेमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात आढळली होती. या धडाकेबाज कारवाईनंतर आता प्रशासनाला थेट जनतेचा पाठिंबा मिळताना दिसतोय. आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द गावातील नागरिकांनी एकत्र येत थेट मंचर-भीमाशंकर रोडवर तुकाराम मुंढेंच्या अभिनंदनाचे आणि समर्थनाचे मोठे फ्लेक्स लावले आहेत.