#

Advertisement

Tuesday, July 14, 2026, July 14, 2026 WIB
Last Updated 2026-07-14T17:10:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माऊलींच्या पालखी सोहळ्यात "अजितदादां"ची एन्ट्री !

Advertisement

एकच वादाची घोषणा अन् सेल्फीसाठी गर्दी  

सासवड : दिवे घाटातून माऊलींची पालखी जात असताना सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. तो म्हणजे या पालखी सोहळ्यात चक्क अजित पवार सहभागी झाले होते. त्यामुळे क्षणभर वारीत सहभागी झालेल्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याला कारण ही तसेच होते. या वारीत अजित पवारांसारखा हुबेहुब दिसणार व्यक्ती सहभागी झाला होता. त्यांनी अजित पवारांसारखाच पेहराव केला होता.
वारीत ज्यावेळी तो सहभागी झाला त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या. ऐवढचं काय तर एकच वादा अजितदादा अशा घोषणा ही दिल्या. त्यामुळे थोडा वेळासाठी तिथलं वातावरण बदललं होतं. सागर बारस्कर असं या तरुणाचं नाव आहे. त्यानेच अजित पवारांचा हुबेहुब पेहराव केला होता. तो पुण्यातील रविवार पेठेतील रहिवासी आहे. आपल्या मनाला वाटलं म्हणून आपण अजित पवारांचा पेहराव केला असं सागरनं यावेळी सांगितलं. दादांची कमतरता आज वाटत आहे. ज्यावेळी आळंदीत पाणी आलं त्यावेळी सर्वात आधी आठवण कुणाची आली असेल तर ती अजित पवारांची होती असं ही त्याने यावेळी आवर्जून सांगितलं.
सागरने सेम टू सेम अजित पवारां प्रमाणे पेहराव केला होता. गुलाबी रंगाचे जॅकेट, डोळ्याला ते घालायचे तसाच गॉगल आणि जशीच्या जशी हालचाल. त्यामुळे सर्वांना क्षणभर अजित पवारच आले की काय असा भास झाला. तिथे उपस्थित असलेल्यांनी ही त्याची कबुली दिली. काही जण म्हणाले की आम्हाला वाटलं अजित दादाच आले. दादा आमच्या सोबत वारीत आहेत असं वाटतय असं ही काहींनी सांगितलं.