Advertisement
मावशीचा खळबळजनक दावा
छत्रपती संभाजीनगर : येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 21 ऑगस्ट रोजी घडली होती. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. सदर प्रकरणी आता कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी धक्कादायक दावा केला आहे.
कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती. आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता, असा खळबळजनक दावा कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी केला आहे. माझे दाजी (मुरलीधर चांदवडे) ड्रायव्हर होते हे आम्ही मानतो मात्र ते गरीब नव्हते. चांगल्या घरातून ते आलेले होते. त्यांच्याकडे शेती होती शेतीतून पैसा यायचा. आजकाल आयफोन स्वस्त आहे, सेकंड हॅन्ड घेतला तर वीस पंचवीस हजार रुपयांमध्ये येतो. कुणाला अभ्यासासाठी, क्लासेससाठी आयफोन हवा होता. तो त्यांनी घेऊन दिला. दीदीकडेसुद्धा (संगीता चांदवडे) आयफोन होता, असं कल्याणी परडे यांनी सांगितलं. एवढी मोठी गोष्ट नाही की, आम्ही त्याला दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला. माझी दीदी म्हणजे संगीता चांदगुडे हे तिच्या सासरच्या मंडळी संदर्भात नाराज होते त्याला काही कारणे होते. दाजी घर सोडून गेले आणि ते वापस येत नव्हते. त्यामुळे ती व्यथीत होती. त्यांचे वाद वाढत चालले होते त्यांच्यामध्ये कुठलाही संवाद नव्हता. त्यामुळे संगीता चांदगुडेंनी भावना व्यक्त करण्यासाठी यूट्यूबला एक माध्यम बवनवलं होतं तिचा तेवढा हक्क आहे. कारण 20 वर्षांपासून ते सोबत होते. ज्या गोष्टी तिला योग्य वाटत नव्हत्या, त्यावर तिने बोलणं वाईट नाही. तिच्या हक्कासाठी जर ती सासरच्या मंडळीला बोलत असेल तर त्यात वाईट काय? कुणासोबत तिचं बोलणं होत नव्हतं. त्यामुळे तिने सोशल मीडियाला माध्यम बनवलं, अशी माहिती कल्याणी परडे यांनी दिली.
काही जमिनीचे वाद होते. पण त्या संदर्भात मला जास्त माहित नाही. कारण मी तेव्हा लहान होते. कुणालला मरायचे नव्हतेच, त्याला फक्त त्याच्या वडिलांना पुन्हा घरी आणायचे होते. असे केल्याने माझे वडील भावनिक होतील आणि ते माझ्याकडे येतील असे त्याला वाटत होते. चार-पाच दिवसा अगोदर त्यांच्या फोनवरून बोलणं झालं होतं. तेव्हा कुणालने तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता, मला तुम्ही पाहिजे, असे वडिलांना सांगितले होते. त्याला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या. पण त्याला समजून सांगण्याचे अजून पर्याय होते. मात्र त्यांच्या सुसंवाद नव्हता. त्यामुळे हे सगळं घडलं. त्यामुळे कुणाल जास्त तणावात होता. मी सुद्धा त्याला समजून सांगितले होते की, प्रत्येक परिवारात अशा गोष्टी असतात. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याचे वडील पाहिजे होते. मी असे करणार त्याने अजिबात कुणाला सांगितले नव्हते. आणि तसं वाटलं नव्हतं. पण अचानक मला त्याचा कॉल आला आणि माफ करा मी असं करत असल्याचं कुणालने सांगितलं. तो फक्त एक अपघात झाला कारण त्याला पैशांची कमी नव्हती. त्याचे वडील त्याच्यासोबत राहत नव्हते, तरी कुणालवर दोघांचं खूप प्रेम करत होते. तसेही कुणालला काही झालं असतं तर दाजीने जीव दिला असता, एवढं त्यांचं प्रेम होतं. त्याला त्रासामध्ये दाजी कधी पाहू शकत नव्हते. 2025 मध्ये खवड्या डोंगरावर कुणाल आत्महत्यासाठी नव्हे तर फिरण्यासाठी तिथे गेला होता. तो काही कारणावरून तेव्हा नाराज होता मात्र, त्याने त्याच्या आईला मेसेज करून सांगितले होते की. मी संध्याकाळपर्यंत घरी येईल. मात्र दीदीने त्याचा मेसेज बघितला नाही आणि ती पोलीस ठाण्यात पोहोचली. रात्री अकरा वाजता पोलिसांनी तो मेसेज बघितला. आपण अजूनही चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन विचारू शकता. तेव्हा तो खवड्या आत्महत्या करण्यासाठी गेला नव्हता, तर नाराज असल्यामुळे फिरायला गेला आणि संध्याकाळपर्यंत घरी येणार होता. कदाचित यावेळेस देखील कुणालला आत्महत्या करायची नव्हती. फक्त असे भावनिक करून त्याला आई-वडिलाला एकत्र आणायचे होते, असा दावाही कल्याणी परडे यांनी केला आहे.
