Advertisement
अंबादास दानवेंचा ओमराजेंबवर हल्लाबोल
धराशिव : सत्तेत असून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, असं म्हणत दुष्काळ परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या लोकप्रतिनिधींवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी सडकून टीका केली. तुम्ही सत्तेत आहात मदत मिळवून द्या, नुसते पत्र लिहू नका असेही दानवे म्हणाले. ओमराजे निंबाळकर सत्तेत गेले आहेत. आता तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ना आता मदत मिळवून द्या असेही दानवे म्हणाले. कृत्रिम पावसाबाबतही अंबादास दानवे यांनी भूमिका मांडली आहे. कृत्रिम पाऊस वगैरे या गोष्टी होणार नाहीत. कृत्रिम पाऊस झाला असता तर पाऊस पडून सरकार निवांत झोपलं असतं असेही दानवे म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातल्या पीक परिस्थितीची दानवेंकडून पाहणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
धराशिवसह मराठवाड्यात दुष्काळ जन्य परिस्थिती आहे, सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदार शेतीची पाहणी करत मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी पत्र लिहितात. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकुन टीका केली. तुम्ही सत्तेत आहात तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत कशाचे पत्र लिहिता मदत मिळवून द्या, पत्र लिहिता याचा अर्थ तुमच्या सरकार मंत्री मुख्यमंत्री ऐकत नाहीत. यावेळी शिवसेनेत गेलेले खासदार उमराजे निंबाळकरांवरही निशाणा साधला. आता तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आता मदत मिळवून द्या. तर कृत्रिम पावसावर बोलताना असा होणार नाही पाऊस जर झाला असता तर सरकारने पाऊस पडून निवांत झोपला असत असं सांगत कृत्रिम पाऊस होणार नसल्याचं दानवे म्हणाले.
