Advertisement
मनोज जरांगे पाटील यांचे अमृता फडणवीस यांचे आमंत्रण स्विकारले पण...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. अमृता फडणवीसांच्या या निमंत्रणावर आता मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीसांच्या या विधानावर आज मनोज जरांगे यांना विचारण्यात आले. यावर ताईने सांगितलंय ना...मग जेवायला पण जाऊ...पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ, असं मनोज जरांगे म्हणाले.
जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. मनोज जरांगेंचं समाधान होणार नसेल, तर अंतरवाली सराटीला जाणार नाही, अशी भूमिका सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली आहे. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने जरांगेंच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असून, आज उपोषणाबाबत मनोज जरांगे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, आज (10 सप्टेंबर) सकाळी 11.30 वाजता मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जसे दिवस येतील तसा संघर्ष करावा लागतो. कुणबी प्रमाणपत्रांची शिबीरं कशी राबवतात बघू या?, आंदोलन सुरु आहे म्हणून शिबीरं घेतायत का तेही बघू, असंही मनोज जरांगे म्हणाले. मार्गदर्शक सांगतील तसं सरकारचं शिष्टमंडळ वागतं. शिष्टमंडळ येण्याची मी वाट बघत नाही मी मुंबईला जाणार जाणार हे निश्चित आहे. 12 तारखेला एकत्र आलो की तारीखच जाहीर करु, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. आधी चांगली भाषा वापरत होतो. 3 वर्षे एकनाथ शिंदेंना चांगला बोललो. हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे.
