#

Advertisement

Wednesday, September 2, 2026, September 02, 2026 WIB
Last Updated 2026-09-02T15:15:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढा तालुक्यात 'शरद मँगो' वाण तयार

Advertisement

पवारांच्या गोविंद बागेत केली लागवड

बारामती : बारामतीतील गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या हस्ते 'शरद मँगो'ची लागवड करण्यात आली. सोबत पवारांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ऊसाची पाहणी केली. या बागेत AI तंत्रज्ञानाधारित ऊसाची शेतीही करण्यात आली आहे. 'शरद मँगो' हे आंब्याचे वाण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी विकसीत केले आहे. या वाणाच्या आंब्याचे वैशिष्ठ्य म्हणजे एका आंब्याचे वजन साधारण तीन किलो पर्यंत असते. शेतकऱ्यांच्या प्रयोग शिलतेतून आणि मेहनतीतून अशा नव्या वाणांची निर्मिती होत असल्याने हा प्रयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.