#

Advertisement

Wednesday, September 2, 2026, September 02, 2026 WIB
Last Updated 2026-09-02T15:19:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान अंश’ने रचला नवा इतिहास

Advertisement

 

मुंबई : ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा इतिहास रचला. सनी देओलनेही ‘बॉर्डर 2’ने आपला दबदबा कायम ठेवला. शिवाय ‘जन नायकन’, ‘टॉक्सिक’ आणि ‘करुप्पु’ यांसारख्या सिनेमेहीही बॉक्स ऑफिसवर  चर्चेत राहिले.  मात्र, एखाद्या सिनेमाचं यश केवळ त्याच्या कमाईवर ठरत नाही, तर त्याने मिळवलेल्या नफ्यावरही ठरतं. नफ्याच्या बाबतीत 2026 मध्ये नुकताच रिलीज झालेला ‘हनुमान अंश’ हा सिनेमा इतिहास रचताना दिसत आहे. प्रॉफिटच्या बाबतीत ‘हनुमान अंश’ने ‘धुरंधर 2’लाही मागे टाकलं आहे. एवढेच नाही तर, लोक गळ्यात भगवे स्कार्फ घालून, चपला काढून सिनेमा पाहत आहेत. आधी कोणाला माहितही नसलेला सिनेमा पाहण्यासाठी तिकीट काउंटरवर रांगा दिसू लागल्या आहेत.
‘धुरंधर 2’ हा 2026 मधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. या सिनेमाने भारतात तब्बल 1149.30 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे.आतापर्यंत कोणत्याही सिनेमाला एवढी कमाई करता आलेली नाही. मात्र, नफ्याच्या बाबतीत संत नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ने आदित्य धर यांच्या सिनेमाला मागे टाकलं आहे.
‘हनुमान अंश’ हा अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे. निर्मात्यांनी या सिनेमासाठी केवळ 2 कोटी रुपये खर्च केले होते. 7 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत 54 कोटी रुपयांची कमाई केली आहे.एखाद्या सिनेमाचा नफा हा त्याच्या बजेटच्या तुलनेत किती कमाई झाली, यावर ठरतो. बजेटच्या तुलनेत सिनेमाच्या नफ्याचा विचार केला, तर ‘हनुमान अंश’ने 2000 टक्क्यांहून अधिक नफा कमावल्याचं सांगितलं जात आहे. तर ‘धुरंधर 2’चा नफा सुमारे 1000 टक्के असल्याचं म्हटलं जात आहे.