#

Advertisement

Tuesday, November 24, 2026, November 24, 2026 WIB
Last Updated 2026-11-24T13:21:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार निवृत्त होणार नाहीत ! सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोणी निवृत्त व्हायचं हे…”

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे आणि त्यांच्या पक्षाने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी व्हावे, याबाबत पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, खासदार आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी या वृत्तांचे खंडन करत शरद पवार निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार निवृत्त होणार नाहीत. कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवणार आहे. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची अजून पाच वर्षे बाकी आहेत. मग ते निवृत्त कसे होतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या राजकीय निवृत्तीबाबत अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनाही या वृत्तामुळे वेग आला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या शक्यतेचे स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.